स्पर्धा परीक्षांसाठी न्यूजपेपरमध्ये काय वाचावे आणि काय वाचू नये?
एखाद्याला वाटू शकते जर का मी न्यूजपेपर्स वाचलेच नाहीत तर काय होईल? का मी इतकी मेहनत घ्यावी आणि दररोज १-२ न्यूजपेपर्स वाचून, मग त्यावर नोट्स काढावेत? एक वर्षभर ह्या बातम्या लिहून ठेवून काय फायदा होईल?
परीक्षेच्या आधी काही दिवस, चालू घडामोडीवर एक मस्तपैकी लेटेस्ट पुस्तकं घेईन आणि वाचून वाचून रट्टा मारून पाठ करेल सर्व वेळेवर, तेव्हाच लक्षात राहील न! हे काय आतापासून टेन्शन घेत बसायचं! छ्या…
तुम्ही वेळेवर एखादे जाड पुस्तकं समोर घेऊन बसा. जसजशी परीक्षा तोंडावर येईल तसतसा घाम सुटेल, टेन्शन वाढेल, काय वाचू आणि काय नाही असं होईल. आणि नेहमीसारखं घडेल. ते पुस्तकं पूर्ण वाचून होणारच नाही.
पण एक गोष्ट मात्र नक्कीच होईल की परीक्षेमध्ये जेव्हा जनरल स्टडीज चा पेपर हाती येईल तेव्हा नक्कीच तुमचं डोक एकदम शांत असेल, काहीच समजणार नाही, काय करू आणि काय नाही असं वाटेल मग थोड्यावेळाने डोक फिरेल आणि मग तुम्हाला पश्चाताप होईल की खरं ‘मिशन एमपीएससी’ ब्लॉग वर लिहिलेलं मी फॉलो केलं नाही म्हणून ही वेळ आली आणि आता काय लिहू मी ह्या परीक्षेत?
नेहमी परीक्षा झाल्यावर पश्चाताप करता आणि ठरवता की “नाही यार आता तरी खूप अभ्यास करीन आणि पुढच्या परीक्षेत नक्कीच क्लियर होईन, आई शपथ यार”. पण तुमची ती जुनी सवय अजूनही गेली नाही ना! करो, ऐश करो, तुमचं काय जाणार, जाणार ते आई-बापाचे पैसे जाणार ना!
जेव्हा तुमचे अति महत्वाचे वर्ष वाया जातील तेव्हा बराच उशीर झालेला असेल!!!
खाली दिलेले महत्वाचे मुद्दे वाचावेत:
नवीन कायदे, बिल्स (उदा. महिलांसाठी आरक्षण)इ-गावार्नंस (e -governance)प्रशासनिक फेरफार, सरकारच्या वेग वेगळ्या योजनाडीम्ड-युनिवर्सितींशी (Deemed -University) संबंधित व इतर शिक्षणाशी संबंधित बातम्याभारतीय आर्थिक बातम्या- जसे, सरकारच्या पोलिसिज, मोठ्या कंपन्या व त्यांचे बॉस, भारतीय बजेट, चालू पंच वार्षिक योजनांचे आराखडे व त्यात घडून येणार बदल.रुपयाचे दुसऱ्या देशांच्या नाणे शी होत असलेले बदल, दुसऱ्या देशांशी आर्थिक संबंध व नवे करार.आंतरराष्ट्रीय घडामोडी, वेग वेगळ्या देशांशी केलेले करारभारताचे आजूबाजूच्या देशांशी असलेले वाद, सार्क[SAARC], ओपेक[OPEC], एशियन[ASEAN], चोग्म [CHOGM], सारख्या ओर्गानाय्झेशानांशी संबंधित बातम्या, आंतरराष्ट्रीय निवडणुका बद्दल बातम्या.भारतीय सेनेच्या दुसऱ्या राष्ट्रांसोबत झालेल्या एक्झार्स्यीज [excercises], सैनिकी सामान खरेदी करार, सैनिकी ऑपरेशन्स, इत्यादीनवे रोग व त्यावर होणारे उपाय [vaccines], स्वाईन फ्लू, एड्स, इत्यादींवर नवीन उपचाराशी निगडीत बातम्यासोलर एनर्जी, वातावरणाशी संबंधित होणारे बदल व त्यासाठी करण्यात येणार बदलभौगोलीक बदल, त्याची कारणे व त्यामुळे होणारे दुष्परिणाम ह्यावर करण्यात आलेले व करण्यात येणार उपाय इत्यादी.उपग्रह व नवनवीन मिशन्स, बायोतेक्नोलोजीशी संबधित बातम्या, हायब्रीड बीज उपक्रम, इत्यादी.अवार्ड्स कुणाला मिळालेत व कशासाठी – नोबेल पीस प्रायीज, भारतरत्न, खेळांशी संबंधित अवार्ड्स, न्याशाणाल अवार्ड्स, स्पोर्ट्स अवार्ड्स.काही न्यूजपेपरमध्ये नवीन पुस्तक व त्यांचे लेखकाबद्दल माहिती येत असते तर ते लिहून ठेवणे.टेनिस खेळाशी संबंधित बातम्या, क्रिकेट वर फार कमी प्रश्न असतात तर बाकी दुसऱ्या खेळा विषयीच्या बातम्या.
खाली दिलेले मुद्दे महत्वाचे नसल्यामुळे MPSC मध्ये त्यावर प्रश्न येत नाहीत:
राजनीतिक पार्ट्या व त्यांचे दलबदलू धोरण.राजनैतिक नेत्यांची भाषणे व एकमेकांवरच्या टीकाटेररिस्ट ग्रुप्स, माओवादी ग्रुप्स, उल्फा व त्यांचे हल्ले, इतर आतंकवादी संघटन.अक्सीडेनट्स, नवीन ट्राफिक रुल्स, इत्यादीचोरी व इतर गुन्हे, ह्याप्रकारच्या घटनाक्रिकेट, बॉलीवूड बातम्या, फिल्मी गपशप इत्यादी
अजूनही वेळ गेली नसून आगामी परीक्षांसाठी आजपासूनच रोज न्यूजपेपर वाचण्याची सवय लावून घ्या.
Comments
Post a Comment